मुंबईत कारच्या धडकेत तरुणीचा मृत्यू; कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या

कारमधील सर्वजण नशेत होते आणि त्यामुळे हा अपघात घडला

मुंबई । शुक्रवार रात्री एका भरधाव कारने धडक दिल्याने तरुणीचा मृत्यू झाल्याने चुनाभट्टी परिसरात जनक्षोभ उसळला. कारमध्ये एकूण 4 तरुण होते आणि ते मद्यधुंद अवस्थेत असल्याचे सांगितले जात आहे. मद्यधुंद अवस्थेत असल्याने कारवरील ताबा सुटल्याने त्यांनी रस्त्यालगत चालणाऱ्या तरूणीला धडक दिली. यात तिचा मृत्यू झाला. अर्टना पोर्टे असे मृत तरुणीचे नाव आहे.

कारमधील सर्वजण नशेत होते आणि त्यामुळे हा अपघात घडला आहे. यातील चालक हा फरार असून जोपर्यंत मुख्य आरोपीला पोलीस अटक करणार नाहीत तोपर्यंत अर्चनाचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा इशारा तिच्या कुटुंबीयांनी आणि चुनाभट्टी येथील नागरिकांनी पोलिसांना दिला आहे.

AM News Developed by Kalavati Technologies