आपण माझी प्रेरणा... अमृता फडणवीसांकडून पती देवेंद्र फडणवीसांना वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा

माजी मुख्यमंत्री तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आज 50 वा वाढदिवस आहे.

मुंबई | महाराष्ट्राचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी मुख्यमंत्री तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस आहे. या दोन्ही दिग्गज नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना अनेक नेत्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीसांना शुभेच्छा दिल्या आहेत. दोन्ही नेत्यांचा वाढदिवस एकाच दिवशी असल्यानं सोशल मीडिया वापरकर्त्यांनी त्यांच्या काही जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

देवेंद्र फडणवीस यांचा आज 50 वा वाढदिवस आहे. अशातच देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या पत्नी अमृता फडणवीसांनी ट्विट करून प्रेमळ शुभेच्छा दिल्या आहेत. "लोकमाणूस सातत्याने लोकांसाठी निस्वार्थपणे सेवा देणाऱ्या त्यांच्या सार्वजनिक जीवनात अतोनात मेहनत घेणाऱ्या, देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, आपण माझ्या प्रेरणा आहात" अशा शब्दात अमृता फडणवीस यांनी पती देवेंद्र फडणवीसांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.AM News Developed by Kalavati Technologies