योगी सरकारकडून खासदार रवि किशनला वाय प्लस दर्जाची सुरक्षा प्रदान, योगी सरकारचे मानले आभार

खासदार तथा अभिनेता रवि किशन यांना योगी सरकारकडून वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे

नवी दिल्ली । बीजेपीचे खासदार रवि किशन यांना उत्तर प्रदेश सरकारने वाय प्लस दर्जाची सुरक्षा प्रदान केली आहे. याबाबत स्वत: रवि किशन यांनी माहिती दिली आहे. त्यांनी ट्वीट करत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आभार मानले आहे. त्यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे की, 'पूजनीय महाराज, तुम्ही मला वाय प्लस दर्जाची सुरक्षा दिली त्याबद्दल मी आणि माझ्या कुटुंबाकडून तसेच संपूर्ण लोकसभा मतदारसंघाच्या आपले धन्यवाद. जनता आपली ऋणी आहे' असे ट्विट रवि किशन यांनी केले आहे.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात खासदार रवि किशन यांनी ड्रग विरोधात राज्यसभेत भाष्य केले होते. त्या पार्श्वभुमीवर योगी सरकारने रवि किशन यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा प्रदान केली आहे. रवि किशन यांनी गेल्या काही दिवसांपुर्वी असे वक्तव्य केले होते की, बॉलीवुडमध्ये ड्रगचा खुप मोठा जाळा असून, यामध्ये अनेक मोठमोठ्या सेलेब्रिटीचं समावेश आहे. बॉलिवूडमधील ड्रग प्रकरणात अनेक मोठमोठ्या गॅंगचा समावेश असून त्यांचा खुप मोठा नेटवर्क आहे. तसेच या ड्रग माफियांना पाकिस्तानातून कंट्रोल केलं जात असल्याचं मत रवि किशन यांनी व्यक्त केलं होतं. त्यामुळेच त्यांना आता योगी सरकरकडून वाय प्लस दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे.



AM News Developed by Kalavati Technologies

A PHP Error was encountered

Severity: Core Warning

Message: PHP Startup: Unable to load dynamic library 'ftp.so' (tried: /RunCloud/Packages/php72rc/lib/php/extensions/no-debug-non-zts-20170718/ftp.so (/RunCloud/Packages/php72rc/lib/php/extensions/no-debug-non-zts-20170718/ftp.so: cannot open shared object file: No such file or directory), /RunCloud/Packages/php72rc/lib/php/extensions/no-debug-non-zts-20170718/ftp.so.so (/RunCloud/Packages/php72rc/lib/php/extensions/no-debug-non-zts-20170718/ftp.so.so: cannot open shared object file: No such file or directory))

Filename: Unknown

Line Number: 0

Backtrace: