दुकान फोडून चोरट्यांने झुणका भाकरी वर मारला ताव, काढली छानसी झोप, सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून या चोरट्याचा शोध घेणे सुरू आहे.

यवतमाळ | पोटाची आग माणसाला काय करायला लावेल याचा काही नेम नाही मुख्य शहरातील मध्यवस्तीत असलेल्या झुणका-भाकरचे दुकान उत्तररात्री फोडून चोरट्यांनी चक्क झुणका भाकरीवर ताव मारला या चोरट्याने हाताने दार फोडून आत प्रवेश केला संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद झाला. यवतमाळच्या गांधी चौकात मोर यांचे झुणका-भाकर केंद्र आहे. लॉकडाऊनचा काळात मोर कुटुंबीयांनी अनेक गरजूंना व रस्त्यावरील निराधारांना मोफत झुणका-भाकर वितरण केले पैसे असले नसले तरी परिस्थिती पाहून गरीब व्यक्तीला ते झुणका-भाकरी साठी नाही म्हणत नाही त्यामुळे हे झुणका-भाकर केंद्र शहरात सर्वत्र प्रसिद्ध आहे.

रात्री एक चोरटा या झुणका भाकर केंद्रासमोर त्यांनी झुणका-भाकर केंद्रांची लाकडी दार हाताने ओढून तोडले व आत प्रवेश केला त्याने रोख रक्कम रक्कम शोधण्याऐवजी सर्वप्रथम तेथील स्वयंपाक घरात जाऊन खायला काही आहे का याचा शोध घेतला शेव भाजी झुनका भाकर याच्यावर यथेच्छ ताव मारून पोटाचा दाह शांत झाल्यानंतर त्यांनी दुकानातील गल्ला उचलला त्यातील 250 रुपयांची रोख खिशात टाकून दुकाना बाहेर झोपी गेला हा चोरटा त्या परिसरातील असून परिचित असल्याचे सांगितले जाते शहरात पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून या चोरट्याचा शोध घेणे सुरू आहे.AM News Developed by Kalavati Technologies