अन्... पोलिसांच्या हृदयालाही फुटला पाझर, वाचा कोविड सेंटर मधून पळालेला शेतकरी काय सांगतो...

मारेगाव येथील कोविड सेंटर मधून काल एक कोरोनाबाधित रुग्ण पळाला होता.

यवतमाळ | जिल्ह्यातील मारेगाव येथील कोविड सेंटर मधून काल एक कोरोनाबाधित रुग्ण पळाला होता. अथक प्रयत्नानंतर आज तो पोलिसांना सापडला, मात्र त्याच्या रुग्णालयातून पळून जाण्यामागचे कारण ऐकून तुम्हालाही गहिवरून येईल. कारण तो रुग्ण जीवाच्या आकांतान जिवाभावाच्या गुरांसाठी अर्थात आपल्या लाडक्या सर्जा राजाला चारा टाकण्यासाठी पळाला असल्याचे चौकशीत समोर आले आहे.

आपण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर आपले लाडके सर्जा राजा घरी एकटे आहेत, त्यांना कोणी चारा पाणी कोण देईल? या विवंचनेत हा रुग्ण होता. सतत हा विचार त्याला अस्वस्थ करून जात होता. या विवंचनेतून काल सकाळी हा रुग्ण कोविड सेंटर मधून फरार झाला. पोलीस यंत्रणा सतर्क असल्याने हा रुग्ण काल दिवसभर लपून बसला. अखेर आपल्या गावी परतत असताना पोलिसांना हा सापडला. यामुळे प्रशासनाने सुटकेचा निश्वास टाकला आहे.

पोलिसांनी विचारपुस केल्यानंतर "साहेब स्वत: साठी नाही हो, जीवभावाच्या राजा सर्जाला चारा टाकण्यासाठी मी न सांगता निघून आलो". आपल्याला भुक लागली तर आपण जेवण मागू शकतो पण मुक्या जित्रबाचं काय?... त्याचे हे बोलणं ऐकूण पोलिसांच्या हृदयालाही पाझर फुटला. आपल्या घराच्या पाळीव प्राण्यांवर किती प्रेम असत हे यावरून सिद्ध होत. नशीबाचा भाग म्हणजे हा रुग्ण गेल्या 24 तासात कोणाच्याही संपर्कात आला नाही. अखेर पोलिसांनी त्याला दिलासा देऊन रुग्णालयात दाखल केलं आहे.AM News Developed by Kalavati Technologies