यवतमाळ | कोसदनी घाटात ट्रक उलटला, चालक जागीच ठार

चालकाचे वाहनवरील नियंत्रण सुटल्याने घडला अपघात

यवतमाळ | दगडी कोळसा घेऊन जाणाऱ्या  ट्रकला अपघात होऊन चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना सकाळी 6 वाजता कोसदनी घाटात घडली आहे. चंद्रपूर येथून दगडी कोळसा घेऊन महागावकडे येत असलेला ट्रक एम एच 26 एच 6485 कोसदनी घाटात आल्यावर चालकाचे वाहनवरील नियंत्रण सुटले व ट्रक पलटी झाला. या अपघातात चालक गणेश राठोड रा. आमणी ता. महागाव यांचा जागीच मृत्यू झाला तर क्लिनर विठ्ठल देवकर रा. करंजखेड हा जखमी झाला आहे. अपघाताची माहिती महामार्ग पोलीस अधिकारी विठ्ठल दुरपडे यांना मिळताच त्यांनी जखमी झालेल्या विठ्ठल देवकर यांना तात्काळ उपचारासाठी जवळच्याच रुग्णालयात दाखल केले आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.AM News Developed by Kalavati Technologies