अभिनेत्री कंगना रणौतला केंद्राकडून "वाय" दर्जाची सुरक्षा; गृहमंत्र्याचे मानले आभार

येत्या 9 सप्टेंबरला कंगना मुंबईत येत असल्याने, गृहमंत्री अमित शहांकडून वाय सुरक्षा कंगनाला देण्यात आली आहे

नवी दिल्ली । अभिनेता सुशांतसिंह प्रकरणाच्या मुद्दावरून चर्चेत असलेली अभिनेत्री कंगना रणौत हिने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीर सोबत केल्याने, महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच पेटले आहे. 'बॉलिवुडच्या माफियांपेक्षा मला मुंबई पोलीसांची जास्त भीती वाटते. मुंबई आता पाकव्याप्त काश्मीर सारखी झाली आहे.' असे वक्तव्य कंगनानं केलं होतं. त्यानंतर संजय राऊत यांनी ट्विट करत सांगितले होते की, 'जर कंगनाला मुंबईची भीती वाटत असेल तर, तीने मुंबईत आपला पाय ठेऊ नये.' त्यानंतर शिवसेना विरूद्ध कंगना असे ट्विट युद्ध सुरू होते. दरम्यान शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी 'कंगना मुंबईत परत आली तर तिचा दाभाड फोडू' असे विधान केले होते. आणि त्याच पार्श्वभूमीवर कंगनाला गृहमंत्री अमित शहा यांनी वाय सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कंगनानं नुकतचं एक ट्विट केला आहे त्यात तीने म्हटले आहे की, "देशभक्ताचा आवाज कुणीही दाबू शकत नाही. मी अमित शहा यांचे आभार मानते. काही दिवसांनंतर मुंबईला जाण्याचा सल्ला अमित शाह मला देऊ शकले असते. मात्र त्यांनी 'भारत की बेटी' ने दिलेल्या शब्दाचा मान राखला. आमचा स्वाभिमान आणि आत्मसन्मान याची लाज राखली. जय हिंद" असं ट्विट कंगनानं केलं आहे.AM News Developed by Kalavati Technologies