Womens Day 2020 : पेण पालिका आयोजित महिला दिन कार्यक्रमाला उत्फुर्त प्रतिसाद

लकी ड्रॉच्या माध्यमातून महिलांनी जिंकल्या पैठणी साड्या

रायगड | देशभरात जागतिक महिला दिनानिमित्त विविध प्रकारचे कार्यक्रम पार पडत आहेत. दरम्यान पेण पालिकेच्या वतीने देखील शहरातील महिलांसाठी विविध कार्यक्रमांची रेलचेल करण्यात आली होती. महिलांना इतर वेळी नाही पण किमान जागतिक महिला दिनाच्या वेळी तरी व्यासपीठ उपलब्ध व्हावे या उद्देशाने नगराध्यक्षा प्रितम पाटील यांनी पुढाकार घेऊन हे कार्यक्रम आयोजित केले होते. महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम, सामूहिक नृत्य स्पर्धा आणि लकी ड्रॉ द्वारे पैठणी साड्यांचे वाटप असे एकाच कार्यक्रमातून त्रिवेणी संगमाच्या माध्यमातून एक बहारदार कार्यक्रम पेण पालिकेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता.

शहरातील शेकडो महिलांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा तर वाढवली. शिवाय बाल वयापासून ते जेष्ठ महिलांपर्यंतच्या विविध स्तरातील महिलांनी नृत्य स्पर्धेमध्ये सहभागी होऊन हम भी किसिसे कम नही अशा प्रकारचा स्त्री जागरतेचा दाखला या कार्यक्रमातून दिला. या कार्यक्रमाला स्थानिक आमदार रविशेठ पाटील यांनी उपस्थिती लावून शहराप्रमाणेच तालुका स्तरावर देखील असे कार्यक्रम घेण्याचे सुचविले. तर कार्यक्रमात सहभागी महिलांनी पालिकेच्या या आयोजनाबाबत समाधान व्यक्त करीत अशा प्रकारचे कार्यक्रम दरवर्षी राबवून महिलांना देखील व्यासपीठ खुले करून घ्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

नगराध्यक्षा प्रितम पाटील यांनी महिला क्रिकेटच्या अंतिम सामन्यात यशस्वी होण्यासाठी संपूर्ण संघाला शुभेच्छा देत यापुढे असेच कार्यक्रम दरवर्षी महिलांसाठी आयोजित केले जातील असे सांगितले. या झालेल्या कार्यक्रमातील स्पर्धेत मतिमंद मुलांच्या शाळेतील महिला, पेण पालिकेच्या शाळेतील मुली आणि त्यांच्या मुली पालक वर्ग, जेष्ठ महिला तसेच पालिकेच्या कर्मचारी महिलांनी सहभाग घेऊन शालेय जीवन, गृहिणी आणि कर्मचारी स्तरावरील कौशल्या व्यतिरिक्त इतर गोष्टीतही आम्ही पुढाकार घेऊन यशस्वी भरारी घेऊ शकतो याचे जिवंत उदाहरण आज या कार्यक्रमाद्वारे समाजासमोर ठेवला.AM News Developed by Kalavati Technologies