12 तासात खुनाच्या दोन घटना, तरुणाचा चाकूने भोसकून तर गुंडाची पाण्यात फेकून हत्या

शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या या खुनाच्या घटनेमुळे खळबळ

सांगली । सांगलीत दोन खूनाच्या घटना घडल्या आहेत. एका तरुणाचा चाकूने भोकसून तर एका गुंडांची हत्या करून मृतदेह पाण्याच्या डबक्यात फेकून देण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शहरातील दोन  वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या या खुनाच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

सांगली शहरात गेल्या 12 तासात दोन खुनाच्या घटना घडल्या आहेत.एक महाविद्यालय तरुण आणि एका गुंडाचा खून झाल्याचा प्रकार समोर आला आहे. शहरातील नेमिनाथ नगर येथे बसवराज सिध्दाप्पा लद्दे (वय २०,रा.बापट मळ्याशेजारी, सांगली) या महाविद्यालयीन तरुणावर धारदार शस्त्राने मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास खूनी हल्ला करण्यात आला होता.या हल्ल्यात बसवराज हा गंभीररित्या जखमी झाला आहे.त्याच्या हातावर दोन आणि मांडीवर दोन असे एकूण चार वार करण्यात आले आहेत.जखमी अवस्थेत बसवराज याला सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.आणि उपचारा दरम्यान बसवराज याचा पहाटेच्या सुमारास मृत्यू झाला आहे. बसवराज हा एका महाविद्यालयात शिक्षण घेण्याबरोबर फोटो आणि व्हिडीओ शुटींगचा व्यवसाय करत होता. तर चार ते पाच जणांनी हा खून केला असून नेमक्या कोणत्या कारणातून ही हत्या झाली आहे, हे अजून स्पष्ट होऊ शकले नसून या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

तर शहरातील अहिल्यानगर येथील श्रेयस कवठेकर या रेकॉर्डवरील गुंडाचा खून झाल्याचा प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आला आहे. माधवनगर कॉटन मिल रोडवरील एका पाण्याचा डबक्यात पोत्यात मृतदेह घालून दगड बांधून फेकून देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.कवठेकर हा पोलीस रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगार असून गेल्या चार दिवसांपासून तो बेपत्ता होता.आणि आज त्याचा मृतदेह पाण्याच्या डबक्यात पोत्यात बांधून फेकून देण्यात आल्याचे समोर आले आले आहे.यानंतर कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, मृतदेह बाहेर काढत पंचनामा केला आहे.तर ही हत्या कोणी केली,हे स्पष्ट होऊ शकले नाही. तर शहरात दोन ठिकाणी झालेल्या दोन खुनाच्या घटनेमुळे सांगली शहरात खळबळ उडाली असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.AM News Developed by Kalavati Technologies