आजपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन, 27 विधेयकांवर होणार चर्चा

हिवाळी अधिवेशन हे 13 डिसेंबपर्यंत सुरू राहणार आहे.

नवी दिल्ली | सोमवारपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. यामध्ये अनेक महत्त्वाच्या विधेयकांचा समावेश असणार आहे. आजच्या घडावर देशावरील आर्थिक संकट सर्वात महत्त्वाचे आहे. यासोबतच आर्थिक संकट, शेतकऱ्यांचे प्रश्न, वाढती बेरोजगारी, काश्मीरमधील नाकाबंदी यासोबतच नागरिकत्व दुरुस्ती विधेयक अशा अनेक मुद्द्यावर चर्चा होईल. यावेळी विरोधक सत्ताधारी भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करु शकतात. विरोधकांनी उपस्थित केलेल्या सर्व राष्ट्रीय मुद्द्यांवर संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये सविस्तर चर्चा केली जाणार असल्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सर्वपक्षीय बैठकीत दिले आहे.

बांगलादेश, पाकिस्तान, अफगाणिस्तान या शेजारील देशांमधून भारतात आलेल्या मुस्लीम वगळता अन्य धर्मीय ( हिंदी, शीख, पारशी, ख्रिश्चन, बौद्ध, जैन) निर्वासितांना नागरिकत्व देणारे दुरुस्ती विधेयक आणण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे. हे विधेयक हिवाळी अधिवेशनात संमत केले जाऊ शकते. या संदर्भात केंद्र सरकारकडून वटहुकूम काढण्यात आला आहे. इलेक्टिक सिगरेटची आयात, उत्पादन, जाहिरात आणि वापरावर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. याविषयीही वटहुकूम काढण्यात आलेला आहे. हे विधेयकही मंजूर करून घेण्याला केंद्र सरकारकडून प्राधान्य देण्यात आले आहे. यासोबतच नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांना केंद्र सरकारने बेकायदा नजरकैदेत ठेवले आहे. त्यांना संसदेच्या अधिवेशनाला उपस्थित राहण्याची परवाणगी देण्याची मागणी काँग्रेसचे नेते आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नवी आझाद यांच्याकडून करण्यात आली आहे. सध्या तुरुंगात असलेले काँग्रेसचे नेते पी. चिदम्बरम यांनाही अधिवेशनाच्या कामकाजात सहभागी होण्याची मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.

हिवाळी अधिवेशन हे 13 डिसेंबपर्यंत सुरू राहणार आहे. यामध्ये 27 विधेयके मंजुरीसाठी दोन्ही सभागृहांमध्ये मांडली जातील. काही महत्त्वाच्या विधेयकांचा यामध्ये समावेश आहे. यात वयक्तिक माहिती संरक्षण, तृतीयपंथीयांचे हक्क संरक्षण, इलेक्ट्रिक सिगरेट प्रतिबंध, औद्योगिक क्षेत्राशी निगडित संहिता, कर दुरुस्ती विधेयक, कंपनी दुरुस्ती विधेयक, चिट फंड दुरुस्ती विधेयक, राष्ट्रीय वैद्यकीय आयोग, सरोगसी नियंत्रण विधेयक, जालियनवाला बाग राष्ट्रीय स्मारक दुरुस्ती विधेयक या विधेयकांचा समावेश असणार आहे. AM News Developed by Kalavati Technologies