केडीएमसीत महाविकास आघाडी एकत्र येणार का?, सचिन सावंत म्हणतात...

स्थानिक कार्यकर्ते आणि नेत्यांच्या इच्छेनुसार पक्षश्रेष्ठींचा निर्णय

कल्याण । यावर्षी नोव्हेंबरमध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक आहे. केडीएमसीमध्ये भाजप सेनेची युती तुटली आहे. केडीएमसीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र येणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज काही कामानिमित्त महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत हे कल्याणात आले होते. केडीएमसीत महाविकास आघाडी संदर्भात बोलताना त्यांचे म्हणणे आहे की, नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडी झाली आहे. केडीएमसी निवडणुकीत समन्वय साधण्याचा प्रयत्न केला जाईल. कार्यकर्त्यांची, स्थानिक नेत्यांची काय इच्छा आहे त्यावर पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. येणाऱ्या महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी होणार की नाही या याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.AM News Developed by Kalavati Technologies