नांदेड | सासरवाडीतच पतीने केली पत्नी अन् एक वर्षाच्या मुलाची निर्घृण हत्या

पत्नी गावाकडे येत नसल्या रागात दारुच्या नशेत पत्नीसह एक वर्षाच्या मुलाची गळयावर चाकुने वार करुन क्रुर हत्या

नांदेड | मुखेड तालुक्यातील मंडलापुर येथे सासरवाडीतच पतीने पत्नी व एक वर्षाच्या मुलाची गळा चिरुन हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. देगलुर येथिल आरोपी पती तानाजी भुताळे हा मंडलापुर येथे सारवाडीला आला होता. त्याने पत्नीला गावी येण्यासाठी तिच्याकडे तगादा लावला. परंतु पत्नी गावाकडे येत नसल्या रागात दारुच्या नशेत पत्नीसह एक वर्षाच्या मुलाची गळयावर चाकुने वार करुन क्रुर हत्या केली. यानंतर आरोपी पळुन जात असताना गावातील नागरिकांनी त्याला पकडून ठेवले व घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटना कळताच मुखेड पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत.AM News Developed by Kalavati Technologies