सोशल डिस्टेंसिंगचा फज्जा उडवून कल्याणमध्ये काऊंटरवर सर्रास दारुविक्री, प्रशासनाचा कानाडोळा

कल्याणमध्ये काऊंटरवर सर्रास विक्री सुरु, सोशल डिस्टसिंगचा फज्जा

ठाणे | कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांची वाढती संख्या कमी करण्यासाठी पुन्हा दहा दिवसाचा लॉकडाऊन घेण्यात आला. त्यात आणखीच सात दिवसांची वाढ करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रकारची दुकाने बंद ठेवली आहेत. मात्र दारुची दुकाने सर्रासपणो उघडी आहे. त्यांना लॉकडाऊनचा नियम नाही. दुकानाच्या काऊंटवर विक्री सुरु आहे. त्यामुळे सोशल डिस्टसिंगचा फज्जा उडला आहे. तसेच लॉकडाऊनचे उल्लंघन केले जात आहे. या गंभीर प्रकाराकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाची डोळेझाक होत आहे.

दारु खरेदी करणारे दाटीवाटीने रांगा लावतात. तोंडावर मास्क नाही. अनलॉक वन जाहिर होण्याआधीच दारुचा काळाबाजार मोठय़ा प्रमाणात झाला. दारु ब्लॅकने विकली गेली. अनलॉकमध्ये दुकाने उघडी करण्यास मुभा दिली गेली. मात्र काऊंटवर विक्री न करता ऑनलाईन विक्रीची मुभा दिली गेली. त्यावेळीही गर्दी होतीच. कोरोना रोखण्यासाठी पुन्हा दहा दिवसाचा व आणखीन सात दिवसाचा लॉकडाऊन घेतला आहे. सर्व दुकाने निमूटपणो नियमाचे पालन करुन दुकाने बंद ठेवतात. मात्र दारु ही अत्यावश्यक सेवेत येत नाही. तरी देखील ही दुकाने राजरोज दररोज उघडली जातात.

लॉकडाऊनचे पालन करण्याचे काम महापालिका प्रशासनासोबत पोलिसांनी करायचे आहे. मात्र या दोन्ही यंत्रणांनी हात वरती केले आहेत. तसेच दारु विक्री हा विभाग राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अंतर्गत येतो. त्यांनी तर हाताची घडी तोंडावर बोट ठेवून दारु विक्रीला लॉकडाऊनमध्ये मूक परवानगीच दिली आहे असे चित्र आहे. दारु विक्रीमुळे कोरोना वाढला तर त्याची जबाबदारी राज्य उत्पादन शुल्क घेणार आहे का असा सवाल अन्य दुकानदार व सामान्य नागरीकांकडून उपस्थित केला जात आहे.AM News Developed by Kalavati Technologies