'लॉकडाऊन' करणाऱ्या देशांना WHO चा इशारा, यामुळे धोका संपणार नाही, तर...

WHO ने 'लॉकडाऊन' करणाऱ्या देशांना दिला इशारा, यामुळे कोरोनाचा धोका संपणार नाही, तर ...

नवी दिल्ली | कोरोना व्हायरसचा कहर वेगाने जगभरात पसरत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अनेक देशांनी वेगवेगळे मार्ग अवलंबले आहेत.जगातील बऱ्याचशा देशांनी कोरोनाची खबरदारी म्हणून देशांमध्ये, राज्ये आणि शहरे लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून प्रत्येक देश लॉकडाऊनचा निर्णय घेत आहे. मात्र जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) महासंचालक टेडरोस अधानोम गेब्रियेसस यांनी बुधवारी लॉकडाऊन करण्याऱ्या देशांना खडे बोल सुनावले आहेत.

कोरोना व्हायरसचा बिमोड करण्यासाठी लॉकडाऊन करून कोरोनासोबत लढता येणार नाही. या व्हायरसचा बिमोड करायचा असेल तर कोरोना व्हायरसवर हल्ला करावा लागेल असं म्हंटल आहे. गॅब्रियस म्हणाले, "कोरोना व्हायरस संक्रमणाचा प्रसार कमी करण्यासाठी अनेक देशांनी 'लॉकडाउन' उपाय अवलंबला आहे." परंतु त्यांच्या मते, या उपायांमुळे साथीचा नाश होणार नाही. यावेळी कोरोनो व्हायरसवर हल्ला करण्यासाठी आम्ही सर्व देशांना आवाहन करत आहे. आतापर्यंत आपण कोरोनाला हरवण्यासाठी दुसरी पद्धत अवलंबली नाही आहे. पुढे बोलतांना ते म्हणाले, की "लोकांना घरीच राहून हालचाल थांबवण्यास सांगितल्याने वेळ मिळेल, जेणेकरून आरोग्य यंत्रणेवरील दबाव कमी होईल. पण स्वतःच यामुळे कोरोना साथीचा नाश होणार नाही."

"तथाकथित लॉकडाउन पद्धत स्वीकारलेल्या सर्व देशांना आम्हांला सांगायचं आहे की या वेळेचा उपयोग देशांनी कोरोना विषाणूवर हल्ला करण्यासाठी केला पाहिजे. तुम्ही संधीची खिडकी तयार केली आहे, प्रश्न असा आहे की याचा उपयोग आपण कसा करणार? " विशेष म्हणजे कोरोना व्हायरस हा 180 हून अधिक देशांमध्ये पसरला आहे आणि आतापर्यंत 20 हजाराहून अधिक लोकांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. एकट्या चीन आणि इटलीमध्ये मृतांचा आकडा 10,000 च्या वर गेला आहे. साडेचार लाख लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. जगभरातील देशांमध्ये आपत्कालीन परिस्थिती आहेत. हे रोखण्यासाठी कित्येक देशांनी लॉकडाऊनचा मार्ग स्वीकारला आहे आणि तीन अब्जाहून अधिक लोकांना लॉकडाऊनमध्ये रहावे लागत आहे.AM News Developed by Kalavati Technologies