महात्मा गांधींच्या हत्येमागे कोण होते हे नव्याने सांगण्याची गरज नाही - विजय वडेट्टीवार

सावरकरांच्या संदर्भात आम्ही आमच्या विचारांवर ठाम आहोत

चंद्रपूर । सावरकरांना भारतरत्न मिळायला हवा आणि त्याला विरोध करणाऱ्याला अंदमानच्या कारागृहात धाडू, या शिवसेना नेते संजय राऊत यांच्या वक्तव्याचा मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी चांगलाच समाचार घेतला. विचारांशी तडजोड करून पुढं जाण्याची आमची तयारी नाही, असा इशारा वडेट्टीवार यांनी दिला. सावरकरांच्या संदर्भात आम्ही आमच्या विचारांवर ठाम आहोत. महात्मा गांधी यांच्या हत्येमागे कोण होतं, हे नव्यानं सांगण्याची गरज नाही. शिवसेनेचे आणि आमचे यासंदर्भातील विचार विभिन्न आहेत. मात्र किमान समान कार्यक्रमावर हे सरकार चालत आहेत आणि ते पुढेही चालेल, असा विश्वासही वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.AM News Developed by Kalavati Technologies