'कोरोनावर कोणतेही रामबाण औषध सापडणार नाही', WHO प्रमुखांचा धक्कादायक इशारा

WHO ने सोमवारी म्हटले आहे की, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लस बनवण्याचे काम सुरु आहे. मात्र तरीही कोरोनावर कोणताही 'रामबाण उपाय' कदाचित कधीच मिळू शकणार नाही.

नवी दिल्ली | जगभरात कोरोना व्हायरसने मोठं थैमान घातलं आहे. अनेकांना या आजाराची लागण झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक देशांनी त्यावर लस शोधण्याचं काम सुरू केलं आहे. मात्र अद्यापही कोणत्याही देशाला कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास शक्य तेवढे यश मिळाले नाही. मात्र असे असले तरी कोरोनावर औषध तयार करण्यासाठी अनेक वैज्ञानिकांनी शर्तीचे प्रयत्न सुरुच ठेवले आहे. काही लशीच्या चाचणी या अंतिम टप्प्यात आहेत. यातच जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) प्रमुख डॉ. टेड्रोस अ‍ॅडॅनॉम यांनी, कोरोनावर लस लवकर उपलब्ध व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. मात्र सध्या कोरोनावर कोणतेही औषध उपलब्ध नाही आहे आणि ते मिळेल की नाही असेही दिसत नाही आहे, असं म्हंटल आहे.

WHO ने सोमवारी म्हटले आहे की, COVID-19 चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लस तयार करण्यासाठी आता अधिकच गरज असली तरीही कोरोनावर कोणताही 'रामबाण उपाय' कदाचित कधीच मिळू शकणार नाही. यासोबतच WHO ने असेही म्हटले आहे की भारतासारख्या देशात ट्रान्समिशनचे दर खूप जास्त आहेत आणि त्यांनी दीर्घ युद्धासाठी सज्ज असले पाहिजे.

WHO चे संचालक टेड्रोस यांनी व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत सांगितले की कोरोनावर कोणताही ठोस लस अजून सुद्धा उपलब्ध झालेली नाही. शक्यतो ही लस कधीच उपलब्ध होणार नाही. त्यांनी असेही म्हटले आहे की परिस्थिती सामान्य होण्यास अधिक वेळ लागू शकेल. टेड्रोस यापूर्वी बर्‍याच वेळा म्हणाले आहे की कोरोना कधीही संपू शकत नाही आणि त्याबरोबर जगायला शिका. टेड्रोस म्हणाले की कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जगभरातील लोक सोशल डिस्टन्सिंग, हात धुणे आणि मास्क घालत आहेत आणि हे सुरू ठेवणे आवश्यक आहे. आतापर्यंत जगभरात एक कोटी 81 लाख लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

'लस मिऴाल्यानंतरही कोरोना संपेल, असे नाही'

टेड्रोस म्हणाले की, 'बर्‍याच लस ट्रायलच्या तिसऱ्या टप्प्यात आहेत. आशा आहे की एक लस लोकांना संसर्गापासून वाचवण्यासाठी प्रभावी ठरेल.मात्र, यासाठी कोणतेही निश्चित औषध नाही आणि असेही शक्य आहे की ते कधीही सापडणार नाही. अशा परिस्थितीत, आपण टेस्ट, आयसोलेशन आणि मास्कद्वारे कोरोना थांबविण्याचे कार्य चालू ठेवूया. त्यांनी असेही म्हटले आहे की ज्या मातांना कोरोनाची लक्षण आहेत किंवा कोरोनाचा संसर्ग झाला आहे त्यांनी स्तनपान करणे थांबवू नये. टेड्रोस यांनी याआधी जूनच्या सुरुवातीलाही म्हटले होते की, "आम्हाला माहित आहे की वृद्ध वय असलेल्यांपेक्षा मुलांमध्ये कोरोनाचा धोका कमी असतो, परंतु असे बरेच रोग आहेत जे मुलांना जास्त धोका देऊ शकतात आणि स्तनपानामुळे असे आजार रोखले जाऊ शकतात". दुसरीकडे लवकरात लवकरत लस मिळेल अशी आशाही टेड्रोस यांनी यावेळी व्यक्त केली आहे.AM News Developed by Kalavati Technologies