जळगावात माजी सैनिकावर हल्ला करणाऱ्या भाजप खासदारावर कारवाई कधी होणार - काँग्रेसचा थेट सवाल

मुंबईत निवृत्त नौदल अधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीच्या मुद्दावरून, आक्रमक झालेल्या भाजपला काँग्रेसने; भाजप खासदाराला अटक कधी होणार असा थेट सवाल केला आहे.

मुंबई । मुंबईत निवृत्त नौदल अधिकाऱ्याला मारहाणीमुळे राज्याचे राज्यकारण चांगलेच तापले आहे. मारहाणीच्या मुद्दावरून भाजप महाविकास आघाडी सरकारला चागलंच धारेवर धरत आहे. मात्र आता काँग्रेसने भाजपवर सवाल उपस्थित केला आहे." शिवसैनिकांप्रती भाजपला जर खरा आदर असता तर, जळगाव मधील माजी सैनिक सोनू महाजन यांना न्यायासाठी चार वर्ष भटकावे लागले नसते. त्यांच्यावर 2016 साली हल्ला करण्यात आला होता. त्यावेळी फडणवीस सरकारने त्यांची दखल घेतली नाही. तीन वर्ष त्यांनी त्याची कोणीही तक्रार घेतली नाही. निवृत्त सैनिकांसाठी धडपडणारा भाजप महाजनांना न्याय कधी मिळवून देईल" असा थेट सवाल काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी केला आहे."

जळगावात 2016 साली महाजन यांच्यावर भाजपचे खासदार उन्मेष पाटील यांच्या आदेशानुसार हल्ला करण्यात आला होता. त्यावेळी राज्यात मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस होते. तरीसुद्धा महाजन यांची तक्रार कोणीही दाखल केली नव्हती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर 2019 मध्ये तक्रार दाखल करण्यात आली. परंतु आजपर्यंत खासदार उन्मेष पाटील यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. मुंबईत झालेल्या निवृत्त सैनिकाच्या मारहाणीवर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी फोन करून विचारपुस केली. आता राजनाथ सिंह सोनू महाजन यांना फोन करून विचारपुस करणार का? असा सवाल सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे.AM News Developed by Kalavati Technologies