काय दाखवायचं, काय वगळायचे हा निर्णय सर्वस्वी झी मराठी वाहिनीचा असेल! - अमोल कोल्हे

अर्जुनराव खोतकर यांच्या भावनेविषयी आदर - अमोल कोल्हे

मुंबई ।  माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत होणारा शेवट बघितला जात नाही. म्हणून हे दाखवू नका अशी भावना व्यक्त केली होती. परंतु, गेली २.५ वर्षे मालिका सुरू असताना जगदंब क्रिएशन्स आणि झी मराठी वाहिनीने जबाबदारीने आणि नैतिक कर्तव्यभावनेने ही मालिका केली आहे. माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या भावनेविषयी आदर आहे. परंतु, मुळातच काळजी घेतली असल्यामुळे कुणाच्या सांगण्यावरून काही बदल करण्याची आवश्यकता आहे असे मला वाटत नाही. मालिकेचे चित्रीकरण पूर्ण झाले असून काय दाखवायचे, काय वगळायचे हा निर्णय सर्वस्वी झी मराठी वाहिनीचा असेल! असे मत या मालिकेचे संभाजी म्हणजेच खासदार अमोल कोल्हे यांनी मांडले आहे. स्वराज्यरक्षक संभाजी महाराज मालिकेतला संभाजी महाराज यांच्या अटकेनंतरचा भाग दाखवू नये. अशी मागणी माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी केली होती. खोतकर यांच्या मागणीला खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी संमती दिली आहे. संभाजी राजेंचा अटकेनंतर छळ करण्यात आला होता. तो आम्हा सैनिकांना बघवणार नाही. त्यामुळं हा भाग वगळण्यात यावा अशी मागणी खोतकरांनी केली होती. AM News Developed by Kalavati Technologies