कोरोनाविरूद्धचे युद्ध आपणच जिंकणार, कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात नाही - उद्धव ठाकरे

नागरिकांनी संयम आणि शिस्त ठेवणे गरजेचे - उद्धव ठाकरे

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लढा देण्याऱ्या कोरोना योद्धांचे कौतूक  केले आहे. तसेच कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्यांची पगार कपात करण्यात आली नसल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्या पगाराची विभागणी दोन टप्यात करण्यात आली आहे. कुणाचेही पगार सरकारकडून कापण्यात आले नाही कृपा करून गैरसमज करू नका असं त्यांनी म्हंटल आहे.कोरोना विरूद्धचे युद्ध जिद्द आणि संयम असल्यावर आपणच जिंकू शकतो. मला खात्री आहे की हे युद्ध आपण जिंकणार म्हणजे जिंकणारच असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच राज्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने त्यांनी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. 

खासगी डॉक्टरांनी आपआपले दवाखाने उघडा असे आवाहन देखील त्यांनी डॉक्टरांना दिले आहे. प्रत्येकाने माणुसकीचा धर्म निभावला पाहिजे ते आपलं कर्तव्य आहे असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले आहे. राशन बद्दल बोलतांना केंद्र सरकारकडून आपल्याल सुचना आल्या आहेत. त्याबाबत राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात असल्याचंही त्यांनी म्हंटल आहे. कोणत्याही जीवनाश्यक वस्तूचा तुडवटा निर्माण होणार नाही. आपल्याकडे साठा खूप आहे. थोडा वेळ लागेल पण सर्वांना राशन मिळणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हंटल आहे. नागरिकांनी जीवनाश्यक वस्तू खरेदी करतांना शिस्त पाळली पाहिजे. एकमेकांपासून दूर उभं राहिले पाहिजे. ज्या नागरिकांना सर्दी खोकला ताप आहे त्यांनी न घाबरता पुढे या. त्यांच्यावर उपचार केल्या जातील. थंड पदार्थ खाणे शक्यतो टाळा अशा सुचना देखील त्यांनी दिल्या आहेत. तसेच एसीचा वापर कमी करा घरात मोकळी हवा येऊ द्या, या हवेत मी असं ऐकलं आहे की हा विषाणू कमी प्रमाणात येतो. जर वेळेवर उपचार घेतले तर आपण लवकर बरे होऊ शकतो असा दिलासा त्यांनी राज्यातील नागरिकांना दिला आहे. AM News Developed by Kalavati Technologies