आम्ही कसलाही भ्रष्टाचार केला नाही, काय चौकशी करायची ते करा - देवेंद्र फडणवीस

ते अकलूजमध्ये कैलासवासी शंकरराव मोहिते पाटील यांच्या पुतळ्याच्या आनावरणानंतर पत्रकारांशी बोलत होते

सोलापूर । राज्यात सत्तेवरून पाय उतार झाल्यानंतर फडणवीस सरकारवर सर्वत्र विरोधकांकडून आरोप होत आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राजूशेट्टी, यांच्यासह बाळासाहेब थोरात यांनी फडणवीस सरकारचे घोटाळे बाहेर काढू असे केलेल्या वक्तव्यांचा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी चांगलाच समाचार घेतला. आम्ही कसल्या ही धमक्यांना घाबरत नाही जनतेला आमचा कारभार माहीत आहे. कोणाला काही ही आरोप करायचे असतील तर करावे. आमच्या काळात कोणाची ही अडवणूक केली नाही. कोणते प्रोजेक्ट अडवले नाहीत. कसलाही भ्रष्टाचार केला नाही. कोणाला काय चौकशी करायचे ते करा, असा इशारा फडणवीस यांनी दिला. ते अकलूजमध्ये कैलासवासी शंकरराव मोहिते पाटील यांच्या पुतळ्याच्या आनावरणानंतर पत्रकारांशी बोलत होते. यावेळी माजी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, हर्षवर्धन पाटील, विजयसिह मोहित पाटील, रंजितसिह मोहिते पाटील उपस्थित होते.AM News Developed by Kalavati Technologies