पर्यायी सरकार देण्याच्या निष्कर्षापर्यंत आम्ही पोहचलो आहोत - नवाब मलीक

सरकार स्थापन करताना कॉग्रेसला विश्वासात घेणे गरजेचे आहे

मुंबई । राष्ट्रवादीची तब्बल दोन तास चाललेली मोदी बागेतील बैठक संपली आहे. उद्या सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यात भेट होणार असून महाराष्ट्रात सरकार स्थापनेविषयी चर्चा होईल. पर्यायी सरकार देण्याच्या निष्कर्षापर्यंत आम्ही पोहचलो असून महाराष्ट्रात लवकरच सरकार स्थापन होईल, असा आशावाद राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलीक यांनी बोलून दाखवला.

राज्यात सरकार स्थापन करण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादी कॉग्रेसची आज महत्वपूर्ण बैठक झाली. यानंतर माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलीक म्हणाले की, आम्ही कॉग्रेससोबत महाराष्ट्रात निवडणूक लढवली. त्यामुळे सरकार स्थापन करताना कॉग्रेसला विश्वासात घेणे गरजेचे आहे.

मलिक म्हणाले, “महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती आणि एकूणच परिस्थितीवर आजच्या बैठकीत चर्चा झाली. यावेळी राज्यातील राष्ट्रपती राजवट संपवून लवकरात लवकर पर्यायी सरकार स्थापन करावे या निष्कर्षापर्यंत आम्ही पोहोचलो आहोत. मात्र, काँग्रेससोबत निवडणूकपूर्व आघाडी असल्याने आम्ही ठरवल्याप्रमाणे काँग्रेससोबत चर्चा करुन निर्णय घेणार आहोत.”

“उद्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे  भेटणार आहेत त्यावेळी त्यांच्या यासंदर्भात चर्चा होईल. त्यानंतर मंगळवारी पुन्हा राज्यातील दोन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक होईल त्यानंतर पुढे काय करायचंय याबाबत चर्चा होऊन निर्णय घेतला जाईल,” असे नवाब मलिक म्हणाले.AM News Developed by Kalavati Technologies