जाहिरात घेतली म्हणजे आम्ही विकले गेलो नाही - मंत्री अनिल परब

शिवशाहीच्या वाढत्या अपघाताची कारणे मी शोधली आहेत - अनिल परब

शिर्डी । राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज शिर्डीत साई दरबारी हजेरी लावली. विरोधी पक्षात असताना खुप स्वप्न पडतात, त्यांच्या स्वप्नांना आमच्या शुभेच्छा आहेत. अशी खोचक टीका परब यांनी चंद्रकांत पाटलांवर केली. मध्यावधी निवडणुकीसाठी भाजप तयार असल्याच वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी केलं होत. त्यावर परब यांनी हे वक्तव्य केलं. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाने आज रत्नागिरी येथील नानार प्रकल्पाची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यावर बोलताना शिवसेनेचा विरोध ही शिवसेनेची भुमिका आहे. जाहिरात हे उत्पन्नाच साधन असून जाहिरात घेतली म्हणजे आम्ही विकले गेलो नाही. असं स्पष्टीकरण परब यांनी दिलं.

शिवशाहीच्या वाढत्या अपघाताची कारणे मी शोधली आहेत. खासगी वाहतुकदारही शिवशाही बसेस चालवत आहेत. त्यांनी किती फायदा करुन दिला आणि जर स्वत: परिवहन महामंडळाने शिवशाही चालवली तर काय फरक पडतो. याचा विचार सुरू असून त्यानंतर शिवशाहीच्या बाबतीतला निर्णय घेतला जाईल अस देखील परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले.AM News Developed by Kalavati Technologies