मीरा-भाईंदर शहरात मुसळधार पाऊस, सखल भागात साचले पाणी

काल रात्री पासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मीरा भाईंदर मध्ये अनेक सखल भागात पाणी साचले आहे.

मीरा भाईंदर | गेल्या 24 तासांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने मुंबईसह उपनगराला झोडपून काढलं आहे. काल रात्री पासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मीरा भाईंदर मध्ये अनेक सखल भागात पाणी साचले आहे. काशी मीरा परिसरातील पेट्रोल पंप पाण्या खाली गेले तर मिरारोड, भाईंदर पूर्व पश्चिम भागात पाणी साचल्यामुळे नागरिकांना गुडघ्या भर पाण्यातून जावे लागत आहे. कोरोनाच्या महामारीमुळे महापालिकेने नालेसफाईकडे दुर्लक्ष केल्यामुळे नालेसफाई फोल ठरली आहे. मुसळधार पावसामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाली आहे.AM News Developed by Kalavati Technologies