वर्धा । तळेगावात द बर्निग कारचा थरार, थोडक्यात बचावले सहा जणांचे प्राण

सुदैवाने यात कोणासही दुखापत झाली नाही

वर्धा । तुमसरवरून अकोला येथे लग्नकार्यासाठी जात असलेल्या कारने (क्र. MH 36 6007) वर्धा जिल्ह्यातील तळेगाव येथे अचानक पेट घेतला. या कारमध्ये सहा जण प्रवास करत होते. ते तुमसरवरून आजोल्यासाठी निघाले होते. तळेगावजवळून आष्टी येथील एकाला सोबत घ्यावयाचे असल्याने त्यांनी आपली गाडी तळेगाववरून आष्टीकडे वळविली असता गाडी अचानक बंद झाली. पुन्हा सेल्फ मारला असता अचानक आवाज होऊन गाडीने पेट घेतला. ही आग इतकी भयंकर होती की कारचा अक्षरशः कोळसा झाली. सुदैवाने यात कोणासही दुखापत झाली नाही. यानंतर घटनास्थळी आलेल्या अग्निशमन दलाच्या गाडी आगीवर नियंत्रण मिळवले. AM News Developed by Kalavati Technologies