वर्धा । शेतात जंगली जनावरांचा धुमाकूळ

शेतकरी अतिवृष्टीच्या संकटात सापडला आहे आणि उरलेसुरली पीकांची जंगली जनावरे नुकसान करत आहेत

वर्धा । वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे तालुक्यातील मौझा सुसुंद्रा येथील सतीश लक्ष्मणराव लाड यांच्या शेतात शेत सर्वे नंबर 129/1 आराजी 1:28 आर मध्ये जंगली जनावरांनी, (रानडुकरांनी) आज रात्रीच्या वेळेला शेतात पदार्पण करून कपाशीच्या पिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस करून पूर्ण कपाशीचे झाडे फस्त केली त्यात त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे आढळून आले. सुसुंद्रा हे गाव पारडी बिट ला येत असून त्याचे रेंज ऑफिस तळेगाव आहे शेतकरी नुकसान भरपाई साठी धावपड करते पण त्यांच्या पदरी फक्त निराशा मिळते कारण येणारी रक्कम फक्त 1500 ते 2500 रुपये इतकी असते त्यामुळे येथील शेतकरी मोठ्या विवंचनेत सापडला आहे त्यामुळे शासनाने जंगलाला कुंपण करून शेतकऱ्यांप्रति भावना जाग्या करण्याची अत्यंत गरज आज पडलेली आहे. एकतर शेतकरी अतिवृष्टीच्या संकटात सापडला आहे आणि उरलेसुरले पीक जंगली जनावरे नुकसान करत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठया प्रमाणात या घटनेचा धक्का बसलेला आहे. यावर शासनाने योग्य ते कार्यवाही करून तसेच मोक्यावर येऊन पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात येण्याची मागणी शेतकऱ्यांकडून जोर धरू लागली आहे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना अधिकारी कितपत न्याय देईल याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे शेतकरी शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी आत्महत्या सारख्या गोष्टीला बडी पडत असून यावर अंकुश लावणे फार गरजेचे आहे.AM News Developed by Kalavati Technologies