दशहारा दिनानिमित विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यास द्राक्षाची आकर्षक आरास

आजपासुन दशहारा सुरू झाला असून आज पहिला दिवस असल्याने श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यास आज आकर्षक व सुंदर अशी द्राक्षाची आरस करण्यात आली आहे.

पंढरपूर | आजपासुन दशहारा सुरू झाला आहे. आज पहिला दिवस असल्याने श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यास आज आकर्षक व सुंदर अशी द्राक्षाची आरस करण्यात आली आहे. यावर्षी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने विठ्ठल रुक्मिणी मंदिर दर्शनासाठी बंद केले आहे. त्यामुळे भाविकांना विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनाचा लाभ घेता येणार नाही.

मंदिर बंद असले तरी देवाचे नित्योपचार सुरू आहेत. आज पासून दशहारा सुरू झाल्याच्या निमित्ताने आज विठ्ठलाला सुंदर अशा द्राक्षांची व द्राक्षांच्या पानांची आकर्षक सजावट केली आहे. देवाचा गाभारा आणि प्रवेशद्वार, रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात व मंदिरात द्राक्षांचे व द्राक्षांच्या पानांची सुंदर आरस करण्यात आली आहे. पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील द्राक्ष बागायतदार कृष्णांत लक्ष्मण देशमुख यांनी त्यांच्या शेतातील द्राक्षे दिली आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात द्राक्ष आरास बनवण्याचे काम श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांनी केले असल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी सांगितले.AM News Developed by Kalavati Technologies