सोशल मीडियातील आक्षेपार्ह पोस्टमुळे बंगळुरूमध्ये हिंसाचार; बंगळुरूत कलम 144 लागू..

एका अधिकाऱ्यासह 60 लोक गंभीर जखमी झाले असून, बंगळुरूत कलम 144 लागू करण्यात आली आहे

बंगळुरू । एकीकडे कोरोनाचा संकट देशावर असतांना कोणीही जमावबंदी करू नये असे आदेश देण्यात आले असतांना, दुसरीकडे मात्र ह्या आदेशाची पायामल्ली होतांना दिसत आहे. कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये कोरोनाच्या काळात हिंसाचार उसळला आहे. आमदारांच्या भाच्याने केलेल्या फेसबुक पोस्टनंतर हा हिंसाचार घडला आहे. संतप्त जमावाने काँग्रेसचे आमदार श्रीनिवास मूर्ती यांच्या घरावर हल्ला केला. जमावाला रोखण्यासाठी पोलिसांनी फायरिंग करावी लागली असून, त्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

तर एका अधिकाऱ्यासह 60 लोक गंभीर जखमी झाले आहेत. तसेच सोशल मीडियावर आक्षेपार्ह्य पोस्ट लिहिल्यामुळे काँग्रेस आमदार श्रीनिवास मूर्ती यांच्या भाच्याला अटक करण्यात आली आहे.श्रीनिवास मूर्ती यांच्या भाच्याने मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास मुस्लिम समुदायातील शेकडो लोकांनी श्रीनिवास मूर्ती यांच्या घरासमोर गर्दी केली. संतप्त जमावाने मूर्ती यांच्या घरावर दगडफेक केली.

एवढेच नाही तर, तिथे असलेल्या 2-3 गाड्यांना आगही लावण्यात आली. त्यानंतर संतप्त जमावाने आपला मोर्चा डीजे हल्ली पोलीस स्थानकाकडे वळवला. आणि तिथेही मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली. संतप्त जमावाची आक्रमकता आणि उफाळलेला हिंसाचार शांत करण्यासाठी पोलिसांना फायरिंग करावी लागली. या फायरिंगमध्ये दोन लोकांचा मृत्यू झाला आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी बंगळुरूत कलम 144 लागू करण्यात आले आहे. याशिवाय डी.जे.हल्ली आणि के. जे.हल्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीत कर्फ्यू लावण्यात आला आहे.AM News Developed by Kalavati Technologies