संचारबंदीचे उल्लंघन करणे पडले महागात, कोर्टाने सुनावली 'ही' शिक्षा

संचारबंदीत बाहेर फिरणाऱ्या टवाळखोरांना कोर्टाचा दणका, सुनावली 'ही' शिक्षा

बारामती | संचारबंदीचे उल्लंघन करून दुकाने उघडणे तसेच विनाकारण दुचाकीवर घराबाहेर पडणाऱ्यांना 3 जणांना न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. या तिघांना न्यायालयाने प्रत्येकी 3 दिवसांची कैद तर 500 रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. अफजल बनीमिया आत्तार (वय 39) चंद्रकुमार जयमंगल शहा (वय 38) अक्षय चंद्रकांत शहा (वय 32) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. 

तिघेही आरोपी बारामतीत राहणारे असून संचारबंदीच्या काळात दुचाकीवर बाहेर पडणे तसेच दुकाने उघडणे असे आरोप त्यांच्यावर होते. त्यावरून आता न्यायालयाने त्यांना ही शिक्षा सुनावली आहे. कोरोनाचे संकट देशावर असतांना एकीकडे कोरोना योद्धा डॉक्टर, पोलीस, प्रशासकीय अधिकारी जिवाची बाजी लावून आपले कर्तव्य पार पाडत आहे. तर दुसरीकडे काही टवाळखोर नागरिक हुल्लडबाजी करत घराबाहेर पडतांना दिसून येत आहे. अशा टवाळखोरांवर कारवाई करण्याचे पाऊल पोलिसांनी उचलले आहे.AM News Developed by Kalavati Technologies