विनोद तावडेंचा पत्ता कट, प्रवीण दरेकरांना बोरीवलीतून उमेदवारी - सूत्रांची माहिती

प्रवीण दरेकर हे मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतले आणि विश्वासू समजले जातात.

मुंबई । माजी शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचा पत्ता अखेर कट झाला असून बोरीवलीतून मुख्यमंत्र्यांचे विश्वासू प्रवीण दरेकर निवडणूक लढणार असल्याची सुत्रांची माहिती आहे. काल भाजपाने उमेदवारांची दुसरी यादी जाहिर केली. या यादीत अनेक दिग्गज नेत्यांची नावे नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. यामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे तसेच विनोद तावडे यांचेही नाव नसल्याने तर्क वितर्कांना उधाण आले होते. आज अखेर तावडे यांना उमेदवारी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:च्या मर्जीतील माणूस मैदानात उतरवला आहे. प्रवीण दरेकर हे मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतले आणि विश्वासू समजले जातात. प्रवीण दरेकर यांचा मागाठाणे हा मतदारसंघ शिवसेनेकडे गेल्याने दरेकरांना बोरोवलीतून उमेदवारी मिळणार असल्याची सुत्रांची माहिती आहे.AM News Developed by Kalavati Technologies