मराठा आरक्षणावरून विनायक मेटेंनी राजकारण करू नये - बाळासाहेब थोरात

अशोक चव्हाण हे उत्तम कार्य करत असल्याचं बाळासाहेब थोरात याचं स्पष्टीकरण

नागपूर । मराठा आरक्षणावरून विनायक मेटेंनी राजकारण करू नये, अशोक चव्हाण हे उत्तम काम करत असल्याची प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी दिली. नागपूरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिवाय मराठा आरक्षणावरून राज्य सरकार देखील अनेक वेळा विविध बैठका घेऊन चर्चा करत असल्याचे ही थोरात यांनी सांगितले. त्यामुळे विनायक मेटेंच्या आरोपात काही तथ्य नाही. असेही बाळासाहेब थोरात म्हणाले.

नागपूरातील कोरोनाच्या स्थितीबाबत प्रशासकीय अधिकारी व सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्यानंतर थोरात यांनी पत्रकार परिषद घेत पत्रकारांशी संवाद साधला. मराठा आरक्षणावर बोलतांना, विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणावरून राजकारण करू नये, अशोक चव्हाण व समितीच्या माध्यमातून या बाबत उत्तम काम सुरू असल्याची प्रतिक्रिया महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. त्यामुळे विनायक मेटे यांच्या आरोपात काहीही तथ्य नसल्याचे थोरात यांनी सांगितले. शिवाय राज्य सरकार म्हणून कोरोनाच्या संपूर्ण परिस्थिती लवकरात लवकर नियंत्रण कसे आणता येईल यासाठी सरकार म्हणून महाविकास आघाडी प्रयत्न करत असल्याचेही थोरात यांनी सांगितले.

नागपूरात प्रशासकीय अधिकारी व पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावून शहरातील कोरोना स्थितीबाबत माहिती घेऊन संबंधित नियोजन करण्याचे आदेश देण्यात आल्याचे यावेळी थोरात यांनी सांगितले. त्याचबरोबर कोरोनाच्या या काळात राज्याचे मुख्यमंत्री स्वतः उत्तम काम करत असल्याचेही थोरातांनी सांगितले. शिवाय कोरोनाच्या या काळात राज्य सरकारकडून सर्वाधिक कोरोना चाचणी केल्या जात असल्याने परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करत असल्याचेही बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

त्याचबरोबर महाविकास आघाडी सरकारच्या किमान समान कार्यक्रमामुळे शेतकऱ्यांना अधिक फायदा मिळाला आहे. त्यामुळे सरकार म्हणून संकटाच्या काळातही लोकांच्या हिताचेच निर्णय घेतल्या जात असल्याचेही थोरात यांनी सांगितले. शिवाय सुशांतसिंह राजपुत प्रकरणाबाबत विचारले असता या बाबत अभ्यास सुरू आहे, त्यामुळे यावर भाष्य करणे चूकीचे असल्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.



AM News Developed by Kalavati Technologies