शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या पासून तीन दिवसीय प्रचार दौऱ्यावर

मंगळवारी दादर येथील शिवाजीपार्क मैदानावर दसरा मेळावा पार पडल्यावर बुधवारपासून शिवसेनेच्या प्रचाराला सुरुवात होणार आहे.

मुंबई | विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरू झालेला आहे. सर्वच पक्ष आपल्या तयारीला लागले आहे. दरम्यान शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही निवडणुकीच्या तयारीला लागले आहे. बुधवारीपासून उद्धव ठाकरे हे तीन दिवसीय प्रचार दौरऱ्यावर असणार आहे. मंगळवारी दादर येथील शिवाजीपार्क मैदानावर दसरा मेळावा पार पडल्यावर बुधवारपासून शिवसेनेच्या प्रचाराला सुरुवात होणार आहे. या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. यानंतर उद्धव ठाकरे हे नाशिक पुणे येथे सभा घेणार आहेत.

उद्धव ठाकरेंच्या सभांचे नियोजन
9 ऑक्टोबर - शिर्डी, संगमनेर, श्रीरामपूर पारनेर व नगर शहर
10 ऑक्टोबर - संभाजीनगर, घनसावंगी, वैजापूर, कन्नड, संभाजीनगर शहर
11 ऑक्टोबर - अमरावती, जुन्नर, खेड आळंदी, पिंपरी

आज शिवसेनेचा दसरा मेळावा शिवसेनेच्या परंपरे प्रणाने दादरच्या शिवाजी पार्क मैदानात हा मेळावा होणार आहे. निवडणुकीच्या काही दिवस आधी आलेल्या या दसऱ्या मेळाव्याला एक विशेष महत्व आलेलं आहे. शिवसेना यावेळी विधानसभेच्या निवडणुकांना युतीतून सामोरे जात आहे. मात्र मुख्यमंत्री हा शिवसेनेचा करणार असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. म्हणून नेमकं यावर उद्धव ठाकरे आज काय बोलणार याकडे तमाम शिवसिनिकांचे लक्ष लागले आहे. तसेच राज्यत अनेक ठिकाणी शिवसेनात बंड झालं आहे. त्या बंडखोराना उद्धव ठाकरे कशी तंबी देणार याकडे देखील सर्वांचे लक्ष असणार आहे.AM News Developed by Kalavati Technologies