दिग्रस नगरपालिकेकडून विविध उपाय योजना; अत्यावश्यक सेवा घरपोच मिळण्याची सुविधा

शहर निर्जंतुकीकरण आणि अत्यावश्यक सेवा घरपोच मिळण्याची सुविधा

दिग्रस | कोरोना संसर्ग पसरण्यापासून रोखण्यासाठी सरकारने संचारबंदी लागू केली आहे.  यामुळे सामान्य जनजीवनावर परिणाम झाला आहे.  अशा परिस्थितीत लोकांना काही प्रमाणात सुविधा व्हावी म्हणून यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस नगर पालिकेने पुढाकार घेऊन काही प्रयत्न सुरू केले आहे. यामध्ये रस्ते निर्जंतुकीकरण आणि नित्य उपयोगी वस्तू घरपोच मिळवण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे.

दिग्रस नगर पालिकेचे आरोग्य सभापती बाळू जाधव उपाध्यक्ष अजिंक्य मात्रे नगरसेवक सय्यद अक्रम आणि इतर नगर सेवकांनी पुढाकार घेऊन शहर  स्वच्छतेचे कार्य सुरू केले आहे. यंत्राच्या साह्याने शहराच्या मुख्य भागातील रस्ते निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.  फवारणी यंत्राच्या माध्यमाने निर्जंतुकीकरण औषध ठिकाणी शिंपडले जात आहे.  तर दैनंदिन गरजा भागविता याव्या म्हणून काही व्यापारी प्रतिष्ठान च्या माध्यमातून किराणा वस्तू घरपोच पोहोचविण्याची व्यवस्था देखील करण्यासाठी नगर पालिकेने पुढाकार घेतला आहे.  सदर व्यापारी प्रतिष्ठानाची यादी त्यांचा व्हाट्सअँप क्रमांक आणि व्यापारी प्रतिष्ठानाचे नाव नगर पालिकेने अधिकृतपणे जाहीर केले आहे.  त्या क्रमांकावर संपर्क करून नागरिक किराणा वस्तू घरपोच मिळू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे.  यामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.AM News Developed by Kalavati Technologies