सीएएविरोधात चिथावणीखोर भाषण करणाऱ्या डॉ. कफील खानला मुंबई विमानतळावर अटक

उत्तरप्रदेशातील अलिगड मुस्लिम विद्यापीठात डॉ कफील खान हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी 12 डिसेंबर 2019 रोजी आले होते.

मुंबई | उत्तर प्रदेश एटीएसकडून डॉ.कफील खान याला मुंबई विमानतळावर अटक करण्यात आली आहे. एनआरसी आणि सीएएच्या विरोधात होत असलेल्या आंदोलनात खान याने अलिगढ मध्ये भडकावणारे भाषण केले होते. मुंबईतल्या नागपाडा परिसरात सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी खान मुंबईत आला होता. गोरखपूर मेडिकल कॉलेजमधून कफिल खान याला निलंबित करण्यात आले आहे. मुंबई पोलिसांच्या मदतीने उत्तर प्रदेश एटीएसने त्याला विमानतळावर बेड्या ठोकल्या आहेत.

उत्तरप्रदेशातील अलिगड मुस्लिम विद्यापीठात डॉ कफील खान हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी 12 डिसेंबर 2019 रोजी आले होते. त्यावेळी त्यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबद्दल विद्यार्थ्यांना चुकीचे मार्गदर्शन केले. तसेच त्यांना भडकावणारे भाषण केले. या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली. उत्तर प्रदेशमधील स्पेशल टास्क फोर्स त्यांच्या मागावर होते.

विद्यार्थ्यांना संबोधित करताना खान म्हणाले होते की, 'मोटाभाई' (अमिक शाह) सर्वांनाच हिंदू किंवा मुस्लिम होण्यासाठी शिकवले आहे. मात्र ते मनुष्य बनू नका असे शिकवत आहेत. ते पुढे म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अस्तित्व असल्यामुळे त्यांना घटनेवर विश्वास नाही. खान म्हणाले की, सीएए मुसलमानांना द्वितीय श्रेणीचे नागरिक बनवते. एनआरसी लागू होताच लोकांना त्रास दिला जाईल. ही आपल्या अस्तित्वाची लढाई आहे. ती आपल्याला लढावीच लागेल. दाढी ठेवणारे लोक हे दहशतवादी असतात असे आरएसएस शाळांमध्ये शिकवले जाते, असा आरोपही डॉ. कफील खानने केला आहे.AM News Developed by Kalavati Technologies