केवळ 'दोन' तासाच वाजवता येणार फटाके, नियम तोडल्यास होणार कारवाई

परवाना असलेल्या दुकानातूनच फटाके खरेदी करण्याचे आवाहनही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून करण्यात आली आहे.

नवी दिल्ली | उत्तर प्रदेश सरकारने दिवाळीच्या तोंडावर मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारने दिवाळीमध्ये फटाके वाजविण्यासाठी दोन तासांची वेळ ठरवून दिली आहे. आता रात्री 10 नंतर एकही फटाका फोडता येणार नाही. योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने ही बंदी आणली आहे. जर 10 वाजेनंतर फटाके फोडले तर त्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

उत्तर प्रदेशमध्ये आता रात्री 8 ते 10 वाजेपर्यंतच फटाके फोडता येतील. यासोबतच परवाना असलेल्या दुकानातूनच फटाके खरेदी करण्याचे आवाहनही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून करण्यात आली आहे. दिवाळीमध्ये फटाक्यांमुळे ध्वनी आणि वायू प्रदूषण होते. यावर नियंत्रण ठेवता यावे यासाठी हा निर्णय घेण्याता आला आहे. या सर्वांवर नियंत्रण ठेवण्यासाठीच सर्वोच्च न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. याची अंमलबजावणी उत्तर प्रदेश सरकारने केली आहे. त्यानुसार आता केवळ दोन तासच फटाके फोडण्याचा आनंद लुटता येणार आहे. न्यायालयाच्या आदेशामध्ये सार्वजनिक जागांवरच फटाके वाजवणे, परवानाधारकांकडूनच फटाके खरेदी आदी निर्देश देण्यात आले आहेत.AM News Developed by Kalavati Technologies