आग्रा-लखनऊ एक्सप्रेस वेवर मोठा अपघात, बस-ट्रकच्या धडकेत 13 ठार, 31 जखमी

फिरोजाबाद इटावाचच्या बॉर्डरजवळ आग्रा-लखनऊ एक्सप्रेसवेवर रात्री 10 वाजता ही घटना घडली.

फिरोजाबाद | यूपीच्या फिरोजाबादमध्ये आगरा-लखनऊ एक्सप्रेस वेवर डबल डेकर बस आणि ट्रकची जोरदार धडक झाली. या घटनेत आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 31 जण जखमी आहे. जखमींना सैफई मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. फिरोजाबाद इटावाचच्या बॉर्डरजवळ आग्रा-लखनऊ एक्सप्रेसवेवर रात्री 10 वाजता ही घटना घडली.

टायर पंचर झाल्यामुळे ट्रक रस्त्याच्या कडेला उभी होती. यार वेळी भरधाव वेगाने येणाऱ्या डबल डेकर बसने ट्रकला जोरदार धडक दिली. एसएसपी सचिंद्र पटेल यांनी सांगितल्यानुसार या बसमध्ये 40-45 प्रवासी होते. सर्व जखमी प्रवाश्यांना सैफई मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.AM News Developed by Kalavati Technologies