अमेरिकेचा चीनला मोठा धक्का; 33 कंपन्या ब्लॅकलिस्ट करणार

अमेरिकेच्या कॉमर्स डिपार्टमेंटकडून ही माहिती देण्यात आलीय.

डेस्क स्पेशल |  कोरोना विषाणूवरून सतत होत असलेले आरोप आणि वाढते तणाव यांच्या दरम्यान अमेरिकेने चीनला मोठा धक्का दिला आहे. अमेरिकेने चीनच्या 33 कंपन्या व इतर आणि काही संस्थांना इकोनॉमिक ब्लॅकलिस्ट करण्याचं ठरवलंय. त्यानुसार आता मानवाधिकार उल्लंघन आणि अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक असणाऱ्या चीनच्या 33 कंपन्या ब्लॅकलिस्ट करण्यात येणार असल्याची माहिती अमेरिकेच्या कॉमर्स डिपार्टमेंटकडून देण्यात आलीय. कोरोना व्हायरसच्या प्रसाराबाबत अमेरिकेनं चीनवर सातत्याने आरोप केले आहे. कोरोनाचा उगम चीनच्या वुहान शहरात असलेल्या लॅबमधून झाला असं अमेरिकेनं म्हंटल आहे. मात्र चीनने आतापर्यंत या सर्व आरोपाचं केलंय. चीनमुळं जगावर कोरोनाचं संकट ओढवलं आहे चीनला धडा शिकवायला हवा या हेतूने अमेरिकेत मोठी पाऊलं उचलली जात आहे. कोरोना व्हायरसने आतापर्यंत जगात 52 लाखाहून अधिक लोकांना संसर्गित केलं आहे. अमेरिकेत सुद्धा कोरोनानं मोठा कहर केला आहे. अमेरिकेत आतापर्यंत कोरोनाची 1.6 दशलक्षाहून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहे. तसेच कोरोनामुळं 96 हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. AM News Developed by Kalavati Technologies