काश्मीर मुद्द्यावरून ट्रम्प प्रशासनाचा यूटर्न, म्हणाले- आता दखल देणार नाही अमेरिका

आंतरराष्ट्रीय पातळीवर आता एकटा पडला पाकिस्तान

नवी दिल्ली । जम्मू-काश्मीर प्रकरणावर भारताला मध्यस्थतेची ऑफर देणाऱ्या अमेरिकेने आता यूटर्न घेतला आहे. काश्मीर मुद्द्याला द्विपक्षीय असल्याचे सांगत यात आता अमेरिका दखल देणार नसल्याचे म्हटले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमेरिकेत भारताचे राजदूत हर्षवर्धन सिंगला म्हणाले की, अमेरिका दुसऱ्यांदा आपले जुने धोरण अवलंबणार आहे. काश्मीरप्रश्नी भारत-पाकिस्तानने एकत्र येऊन मार्ग काढावा, असे अमेरिकेने म्हटले आहे.

यापूर्वी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला ऑफर दिली होती की, जर त्यांची इच्छा असेल तर अमेरिका काश्मीर प्रकरणात मध्यस्थता करू शकते. परंतु भारताने यावर आपली भूमिका स्पष्ट करत म्हटले होते की, काश्मीर हा द्विपक्षीय मुद्दा आहे. यावरचा निर्णय केवळ दोन देशच करू शकतात. काश्मीरमधून कलम 370 हटल्यानंतर पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान अमेरिकेला मदत मागत असताना आता अमेरिकेने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

जम्मू-काश्मीर प्रकरणावर पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय पातळीवर मदत मागितली, परंतु कोणत्याही देशाने त्यांना प्रतिसाद दिला नाही. पाकचे परराष्ट्र मंत्री काश्मीर मुद्द्यावर मदत मागण्यासाठी चीन दौऱ्यावर गेले होते, परंतु तेथेही त्यांच्या हाती निराशा लागली. यामुळे काश्मीर प्रश्नावर पाकिस्तान आता आंतरराष्ट्रीय पातळीवर एकटा पडल्याचे दिसून येत आहे.AM News Developed by Kalavati Technologies