कनिका कपूरच्या पार्टीमध्ये असणाऱ्या योगींच्या मंत्र्यासह 45 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह

लखनऊमध्ये कनिका कपूरने केली होती पार्टी

नवी दिल्ली | उत्तर प्रदेशचे आरोग्यमंत्री जय प्रताप सिंह यांना कोरोनाची लागण झालेली नाही. त्यांचा कोरोना व्हायरसच्या टेस्टचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. आरोग्य मंत्री जय प्रताप सिंह लखनऊमध्ये सिंग कनिका कपूरसोबत पार्टीमध्ये होते.

आरोग्य मंत्र्यांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह
कनिका कपूरसोबत पार्टीमध्ये असणाऱ्या इतर 30 लोकांचेही सँपल रिपोर्ट आले आहे. सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आहेत. म्हणजेच या लोकांना कोरोना व्हायरस लागण झालेली नाही. यासोबतच कोरोना व्हायरसचे 15 इतर रिपोर्टही निगेटिव्ह आले आहेत. अशा प्रकारे एकून 45 लोकांचा कोरोना व्हायरस रिपोर्ट निगेटिव्ह आहेत. कोरोना संक्रमणची भीती असलेल्या लोकांना दिलासा देणारी ही बातमी आहे. लंडनमधून परतलेली गायिका कनिका कपूर लखनऊमध्ये एका हॉटेलमध्ये थांबली होती. या सूचनेनंतर ही हॉटेल सध्या बंद करण्यात आली आहे.

लखनऊमध्ये कनिका कपूरने केली होती पार्टी
कनिका कपूर अजून एका पार्टीमध्ये सहभागी झाली होती. यामध्ये 100 पेक्षा जास्त सेलिब्रिटीज सहभागी झाले होते. या पार्टीमध्ये अनेक मोठे राजकारणीही सहभागी होते. या पार्टीमध्ये राजस्थानच्या माजी सीएम वसंतुधरा राजेंसोबतच त्यांचे पुत्र आणि खासदार दुष्यंत सिंह, काँग्रेसचे नेता जितिन प्रसाद, यूपी सरकारचे आरोग्य मंत्री जय प्रताप सिंहही सहभागी होते.

शुक्रवारी कनिका कपूरला कोरोना व्हायरस असल्याचे स्पष्ट झाले. तेव्हा मोठा गदारोळ झाला. यानंतर कनिकाच्या संपर्कात आलेल्या बऱ्याच लोकांनी कोरोना व्हायरसची टेस्ट केली. दिलासादायक बातमी म्हणजे या सर्वांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे.AM News Developed by Kalavati Technologies