Unlock India : देशात आजपासून अनलॉक 5 ला सुरूवात..; जाणून घ्या काय राहणार सुरू आणि काय राहणार बंद

देशात अनलॉक 5 ला सुरूवात झाली असून, केंद्र सरकारने त्यासंबंधी गाईडलाइन्स जारी केल्या आहेत

नवी दिल्ली । देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी देशात 24 मार्चपासून ताळेबंदीची घोषणा करण्यात आली होती. लॉकडाऊनचा आज 188 वा दिवस असून, आजपासून देशात अनलॉक 5 ची सुरूवात होत आहे. त्यामुळे देशात हॉटेल, मॉल, धार्मिक स्थळासह अन्य सार्वजनिक ठिकाण उघडण्यास मुभा मिळाली आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात ठप्प झालेली अर्थव्यवस्था पुर्वपदावर येण्यास सुरूवात झाली असली तरीही, मात्र देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.

अनलॉक- 5 अंतर्गत देशात चित्रपटगृहे, मल्टीप्लेक्स, स्विमिंग पूल, इंटरटेनमेंट पार्क उघडण्यास मुभा देण्यात आली आहे. तर शाळा सुरू करण्याबाबत केंद्राने राज्याला कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारवर सोपवला आहे. तसेच चित्रपटगृहात एका हॉलमध्ये 50 जणांना बसण्याची मुभा देण्यात आली आहे. केंद्रिय गृह मंत्रालयाने गाईडलाइन्स जारी करत सांगितले आहे की, 15 ऑक्टोबरनंतर राज्य सरकार कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता शाळा आणि कोचिंग क्लॉसेस सुरू करण्याचा निर्णय घेऊ शकते. मात्र ज्या ठिकाणी कंटेनमेंट झोन आहे त्याठिकाणी हा निर्णय लागू होणार नसल्याचं केंद्राने सांगितले आहे. तर लॉकडाऊन बाबत गृहमंत्रालयाने सांगितले आहे की, राज्य सरकार कंटेनमेंट झोन वगळता आपल्या मर्जीप्रमाणे लॉकडाऊन जाहीर करू शकत नाही. त्यामुळे लॉकडाऊची वेळ आली तर, राज्यांना केंद्राची परवानगी घ्यावी लागणार आहे.

केंद्र सरकारने खेळाडूच्या प्रशिक्षणासाठी स्विमिंग पुल उडण्यासाठी परवानगी दिली असून, मनोरंजन पार्क येत्या 15 ऑक्टोबरपासून उघडणार आहे. तसेच आजपासून म्हणजे 1 ऑक्टोबरपासून अंतर्गत तसेच राज्याअंतर्गत प्रवासाला मुभा मिळाली आहे. त्यामुळे आता प्रवास करतांना प्रवाशी पास घेण्याची आवश्यकता लागणार नाही. तसेच 65 वर्षापेक्षा जास्त वृद्धांना आणि गर्भवती महिलांना घरीच राहण्याचे आवाहन केंद्राने केले आहे. सामाजिक, शैक्षणिक, खेळ, मनोरंजन, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय आणि अन्य कार्यक्रमात 100 जण उपस्थित राहु शकतात. मात्र त्यांना मास्क घालने, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करने अनिवार्य असणार आहे.AM News Developed by Kalavati Technologies