ज्यांचे आमदार जास्त, त्यांचा मुख्यमंत्री हे बाळासाहेबांच्या काळातच ठरलेलं - गडकरी

शिवसेना राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करू शकते यावर गडकरी म्हणाले- अनैसर्गिक युती टिकत नसते!

मुंबई । महाराष्ट्रात सत्तासंघर्ष टिपेला पोहोचलेला असताना अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत आहेत. 13व्या विधानसभेचा कार्यकाळ संपत आल्याने देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला असून राज्यपालांनी तो स्वीकारलाही आहे. दुसरीकडे महायुतीतील दोन्ही पक्ष आपापल्या भूमिकांवर ठाम आहेत. याविषयी पत्रकारांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना विचारले असता त्यांनी सविस्तर उत्तरे दिली. गडकरी म्हणाले की, निकालाच्या पहिल्याच दिवशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमच्याकडे सर्व पर्याय खुले असल्याचे माध्यमांसमोर म्हटले, मग युतीला काही अर्थच राहत नाही.

दुसरी गोष्ट म्हणजे अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाबाबत भाजप अध्यक्षांकडून कोणतेही आश्वासन देण्यात आले नव्हते. लोकसभा निकालांनंतर त्यांची जेव्हा बैठक झाली तेव्हा हा विषय चर्चेला आला होता खरा, परंतु विधानसभेच्या निकालानंतर आपण यावर बोलू असे म्हणून शाह उठून गेले होते. त्यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत कोणतेही आश्वासन दिले नव्हते.

दुसरीकडे, शिवसेना इतर पक्षांच्या म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करू शकते, असे पत्रकारांनी विचारल्यावर गडकरी म्हणाले की, शिवसेना भाजपची युती ही देशाच्या राजकारणात सर्वात जास्त काळ टिकलेली युती आहे. आणि राजकारणात अनैसर्गिक युती फार काळ टिकत नाही. आता पुढे सत्ता स्थापना कोण करेल याविषयी राज्यपाल योग्य तो निर्णय घेतील.AM News Developed by Kalavati Technologies