तुकाराम मुंडेंच्या विरोधात आता गडकरी मैदानात, केली थेट केंद्राकडे तक्रार

तुकाराम मुंढेनी सीईओ पद बळकावलं - नितीन गडकरी

नागपूर | महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे विरुद्ध महापौर व सत्ताधारी असा सामना रंगला असताना या वादात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुर महानगर पालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची तक्रार शहरी विकास मंत्री हरदीपसिंग पुरी व पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री जितेंद्र सिंह यांच्याकडे केली आहे. तुकाराम मुंढे यांनी बेकायदेशीरपणे आणि असंवैधानिकपणे स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सूत्रे हाती घेतल्याचे तक्रारींमध्ये नमूद करण्यात आले आहे.

यासंबंधी केंद्रीय मंत्री व नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांनी मुंढे यांच्याविषयी चौकशी करण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे. स्मार्ट सिटी प्रकल्प अंतर्गत सरकारच्या आदेशानुसार स्मार्ट सिटी कंपनीची स्थापना करण्यात आली. महापालिका आयुक्त मुंढे हे या कंपनीत बोर्ड ऑफ डायरेक्टर व सीईओ म्हणून स्वतः हुन नियुक्त झाले आहेत. वास्तविक पाहता बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या मान्यते नंतरच नव्या सदस्याचे संचालक मंडळात समावेश केला जातो,परंतु 31 डिसेंबर नंतर संचालक मंडळाची एकही बैठक न होता आयुक्त तुकाराम मुंढे हे बेकायदेशीररीत्या संचालक मंडळ सदस्य व सीसीओ झाले. शिवाय स्मार्ट सिटी प्रकल्पाचे बँकेत असलेली 18 कोटींची ठेवीची रक्कम 2 खासगी कंत्राटदारांना वळत्या करण्यात आल्याचा आरोप ही महापौर संदीप जोशी यांनी केला होता.

शासनाच्या बँकेतील ठेवी आयुक्त मुंढे यांनी नियम धाब्यावर बसवून तोडण्यात आल्याचा आरोप महापौरांनी केला होता. महापौर संदीप जोशी यांनी केलेल्या आरोपांची दखल घेऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तुकाराम मुंढे यांची तक्रार केंद्रीय मंत्र्यांकडे केली असून योग्य कारवाई करण्याची मागणी गडकरी यांनी केली आहे.AM News Developed by Kalavati Technologies