मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दिल्ली दौऱ्यावर, मोदी आणि सोनिया गांधींची घेणार भेट

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी याविषयी ट्विट करत माहिती दिली आहे.

नवी दिल्ली | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींची भेट घेणार असल्याचे वृत्त आहे. महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी याविषयी ट्विट करत माहिती दिली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दुपारी 12 वाजता पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहेत. तर सायंकाळी 6 वाजता सोनिया गांधी यांची भेट घेणार असल्याचे वृत्त आहे. महाविकास आघीडीतील समन्वय राखता यावा यासाठी उद्धव ठाकरे सोनिया गांधीची भेट घेणार असे म्हटले जात आहे. महाविकास आघाडीमध्ये आलबेल नसल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या. दरम्यान दिवसांपूर्वी राज्यातील काँग्रेसच्या प्रमुख आमदारांनी दिल्ली दौरा करत सोनिया गांधीची भेट घेतली. त्यानंतर उद्धव ठाकरे सोनिया गांधीना भेटण्यासाठी जाणार आहेत.

यासोबतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही भेट घेणार आहेत. ही भेट सदिच्छा भेट आहे. या भेटीचा कोणताही वेगळा अर्थ काढण्यात येऊ नये असे संजय राऊतांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर ठाकरे यांची पंतप्रधान मोदी यांच्याशी शुक्रवारी दुसऱ्यांदा भेट होणार आहे.AM News Developed by Kalavati Technologies