विधानसभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे देवेंद्र फडणवीसांना चिमटे

दिलेला शब्द पाळणे हे माझं हिंदुत्व आहे. मी पाच वर्षांत कधी ही सरकारला धोका दिलेला नाही.

मुंबई | विधानसभेचे विशेष अधिवेशन आज सुरू आहे. विधानसभेच्या अध्यक्षपदी नाना पटोलेंची निवड करण्यात आली आहे. तर विरोधीपक्ष नेते म्हणून देवेंद्र फडणवीसांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. यानंतर उद्धव ठाकरेंनी आपल्या बोलण्यातून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना चांगलेच चिमटे काढले आहे. 'मी पुन्हा येईन' फडणवीसांच्या घोषणेवरुन ठाकरेंनी त्यांना टोला हाणला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, मी इथं येईल असे कधीच म्हणालो नव्हतो. पण आयुष्य म्हणजे एक रंगभूमी आहे. इथे कधी कोणाला कोणती भूमिका करावी लागेल सांगता येत नाही. असे म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीसांना चिमटा काढला. तसेच पुढे ते म्हणाले की, विरोधी पक्षच अस्तित्वात राहणार नाही, असं मी म्हणेल. कारण आता विरोधकदेखील माझे मित्र आहेत. माझी आणि त्यांची मैत्री खूप जुनी आहे. ती यापुढेही कायम राहील, असही ते म्हणाले.

उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, 'विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आपलं अभिनंदन करण्यासाठी उभा आहे. तुमचा परिचय आज माझ्या हातात आलाय. यापूर्वी आला असता तर, बरं झाले असतं. अनेक वर्षे मैत्री असलेले आज विरोधामध्ये बसले आहेत. तर यापूर्वी विरोधात असलेले माझ्या सोबत बसलेले आहेत. विरोधी पक्षनेता माझा जवळचा मित्र आहे. यामुळे आता आपल्यात अंतर ठेवायला नको. मी इथे पुन्हा कधी येईल, असं बोललो नव्हतो. पण, माझं भाग्य आहे म्हणून मी इथे पुन्हा आलो आहे. त्यावेळी ही हिंदुत्व होतं आणि आजही आहे. मात्र दिलेला शब्द पाळणे हे माझं हिंदुत्व आहे. मी पाच वर्षांत कधी ही सरकारला धोका दिलेला नाही. मला काळोखात काही करायचं नाही. मला शेतकऱ्याला कर्ज मुक्तच नाही करायचं तर, चिंता मुक्त करायचं आहे. देवेंद्र फडणवीस तुम्ही आजही माझे मित्र आहात. तुम्ही जर, माझ्या सोबत असता तर, मी घरी बसून टीव्हीवर हा कार्यक्रम बघत बसलो असतो. असेही यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.AM News Developed by Kalavati Technologies