उद्धव ठाकरे पाच वर्ष झोपले होते का?, अजित पवारांचा सवाल

300 युनिटपर्यंतचा वीजदर 30 टक्के कमी केला जाईल

मुंबई । शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात 10 रुपयांमध्ये जेवणाची थाळी देण्याची घोषणा दसरा मेळाव्यात केली. त्यांच्या या घोषणेचा अजित पवार यांनी समाचार घेतला. 10 रुपयांमध्ये जेवण देणार, शेतकऱ्यांचे कर्जमाफ करणार, असे उद्धव यांनी म्हटले आहे. मागील पाच वर्षे ते झोपले होते का, असा सवाल त्यांनी केला आहे. पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

उद्धव ठाकरेंनी शिवाजी पार्क येथील दसरा मेळाव्यात सर्वसामान्य नागरिकांसाठी काही महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. त्यामध्ये गरिबांना पोटभर जेवण मिळावे यासाठी फक्त 10 रुपयांत थाळी आणि 1 रुपयात आरोग्य तपासणी देण्याचं वचन दिलंय. तसेच, महिलांच्या सुरक्षिततेसाठी बससेवा सुरू केली जाईल. 300 युनिटपर्यंतचा वीजदर 30 टक्के कमी केला जाईल, असे त्यांनी जाहीर केले.AM News Developed by Kalavati Technologies