उद्धव ठाकरेंच्या शपथविधी सोहळ्याला मोहन भागवतांना निमंत्रण नाही

भाजप आणि शिवसेना हिंदुत्वावर आधारित युतीत असताना अनेक वेळा संघाने मध्यस्थीची भूमिका निभावली आहे.

मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत. सायंकाळी 6 वाजून 40 मिनिटांनी हा दिमाखदार सोहळा पार पडणार आहे. मात्र ठाकरेंच्या शपथविधी सोहळ्याचं सरसंघचालक मोहन भागवत यांना निमंत्रण देण्यात आलेलं नाही. हिंदुत्ववादी विचारसरणी असलेल्या शिवसेनेकडून शपथविधीच निमंत्रण संघाला मिळणे अपेक्षित होत. मात्र ते देण्यात आलं नाही. भाजप आणि शिवसेना हिंदुत्वावर आधारित युतीत असताना अनेक वेळा संघाने मध्यस्थीची भूमिका निभावली आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवेसना यांच्या महाविकास आघाडीचे सरकार आता राज्यात स्थापन होत आहे. महाविकास आघाडीचा प्रतिनिधी म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावर विराजमान होणार आहेत. उद्धव ठाकरेंच्या रुपाने पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबातील सदस्य मुख्यमंत्रीपद भूषवणार आहे. या ऐतिहासिक शपथविधी सोहळ्यासाठी देशभरातील बड्या नेत्यांची उपस्थिती असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, सोनिया गांधींसह देशभरातील मुख्यमंत्र्यांना आणि नेत्यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आलेले आहे. मात्र मोहन भागवताना निमंत्रण देण्यात आले नसल्याची माहिती समोर आली आहे. मात्र एक गोष्टी अशीही आहे की, यापूर्वी कोणाच्याही शपथविधीसाठी मोहन भागवत कुठल्याही कार्यक्रमात सहभागी झाले नाही. तसेच नियोजित कार्यक्रमांकरिता भागवत सध्या नागपुरातच आहेत. मात्र तरीही शिवसेनेकडून भागवताना कार्यक्रमाचे निमंत्रणच देण्यात आलेले नाही.AM News Developed by Kalavati Technologies