राज्याचे 'उच्च आणि तंत्र शिक्षण' मंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण

मंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण झाली असून, त्यांनी स्वतः ट्विट करत माहिती दिली आहे

मुंबई । राज्यात कोरोनाचा उद्रेक कायम आहे. दिवसेंदिवस वाढणारी रुग्णसंख्या हा आता चिंतेचा विषय बनत चालला आहे. अगदी सर्वसामान्यांपासून, तर राजकीय नेत्यांपर्यंत कोरोनाची लागण होण्याचं सत्र सुरूच आहे. नुकतचं राज्याचे 'उच्च आणि तंत्र शिक्षण' मंत्री उदय सामंत यांना कोरोनाची बाधा झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवत होती. त्यानंतर त्यांनी आपली कोरोना चाचणी केली असता त्यात ते पॉझिटिव्ह आढळले आहेत. सामंत डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचारासाठी 10 दिवस विलगीकरणात गेले आहे. त्यांनी स्वतः आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे.

सामंत यांनी ट्विट करत सांगितले आहे की, "गेले दहा दिवस स्वतः विलगीकरणात आहे. मी स्वतः कोविड टेस्ट करून घेतली. रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी गेले 10 दिवसात कोणाच्याही संपर्कात नसल्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता अगदी कमी आहे. तरीही माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी. मी ठणठणीत आहे पुढच्या आठवड्यात जनतेच्या सेवेत रुजू होणार." असे ट्विट उदय सामंत यांनी केले आहे.AM News Developed by Kalavati Technologies