अमरावतीत दोन युवकांची गळफास घेऊन आत्महत्या, कारण अस्पष्ट

जिल्ह्यात दोन युवकांनी गळफास घेऊन आत्महत्या केलीची घटना उघडकीस आलीय.

अमरावती | जिल्ह्यात दोन युवकांनी गळफास घेऊन आत्महत्या केलीची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दर्यापूर तालुक्यातील नजीकच्या चंडिकापूर व नांदेड बु। येथील दोन युवक राजदीप थोरात वय 26 वर्ष या युवकाने चंडिकापूर टाकरखेड रस्त्यावरील गिरीजाशंकर विद्यालय परिसरात निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेचा पंचनामा खोलापूर पोलिसांनी केला असून मृदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय दर्यापूरला पाठविले.

तर दुसऱ्या घटनेत नांदेड बु।येथील शंकर सकवार वय 26 वर्ष या युवकाने घराच्या मागे असलेल्या बाभळीच्या झाडाला सकाळच्या सुमाराला गळफास घेऊन आत्महत्या केली घटनेचा पंचनामा दर्यापूर पोलिसांनी केला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय दर्यापूर येथे पाठविले आहेत. या दोन्ही युवकांच्या आत्महत्येचे कारण अद्यापही कळू शकले नाही. पोलीस पुढील तपास करीत आहे.AM News Developed by Kalavati Technologies