पिंपरी चिंचवडमध्ये टेम्पोची स्विफ्ट कारला जोरदार धडक, एक महिला जागीच ठार

अपघात एवढा भीषण होता की दोन्ही ही वाहनच्या धडकेने रस्त्याच्या बाजूला असलेले संरक्षक कठडे तुटले.

पुणे | पिंपरी शहरात भरधाव वेगाने जाणाऱ्या दोन वाहनांची समोरा समोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झालाय. तर अन्य एक गंभीर जखमी झाल्याची घटना घडलीय. शरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्या मुख्य चौकात ही घटना आज दुपारी 1 वाजताच्या सुमारास घडली, ह्या मध्ये जुन्या मुंबई पुणे महामार्गावरून मुंबईकडे जाणाऱ्या स्विफ्ट कार दुसऱ्या बाजूने भरधाव वेगात येणारा तीन चाकी टेंम्पो धडकला हा अपघात झाला प्रत्यक्षदर्शीने सांगितलेल्या माहितीनुसार हा अपघात एवढा भीषण होता की दोन्ही ही वाहनच्या धडकेने रस्त्याच्या बाजूला असलेले संरक्षक कठडे तुटले. यामध्ये अपघातग्रस्त वाहनातील एक महिला जागीच ठार झाली. तर अन्य एकजण गँभीर जखमी झाला आहे. लॉकडाऊनच्या मागील 65 दिवसातील रस्त्यावर झालेला हा पहिला शहरातील पहिलाच गंभीर अपघात आहेAM News Developed by Kalavati Technologies