अपघातानंतर टॅंकरला लागलेल्या भिषण आग दोन जण दगावल्याची भिती

अग्निशमन दलाच्या गाडयांनी सुमारे 3 तासांसानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र तोवर टँकर आगीत जाळून पूर्णपणे राख झाला होता.

नागपूर । नागपूर-अमरावती महामार्गावर कोंढाळी गवानजीकच्या दुधाला पुलासमोर झालेल्या अपघातानंतर रसायन घेऊन जाणाऱ्या टँकरला भीषण आग लागली. या आगीत टॅंकरचा चालक व क्लिनरचा जागीच मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. रविवारी दुपारी नागपूरहून अमरावतीच्या दिशेने रसायन घेऊन जाणाऱ्या टॅंकरचा दुधाळा गावाजवळ रस्ता दुभाजकाला धडक दिली. धडकेत टॅंकरचा टायर फुटल्याने टँकर रस्त्यावर उलटला. उलटताच टँकरने पेट घेतला व क्षणातच आगीच्या मोठ्या ज्वाळा रस्त्यावर दिसू लागल्या. या भीषण आगीमुळे अमरावती महामार्गावरची वाहतूक काही तासांसाठी बंद करण्यात आली होती. अग्निशमन दलाच्या गाडयांनी सुमारे 3 तासांसानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र तोवर टँकर आगीत जाळून पूर्णपणे राख झाला होता.AM News Developed by Kalavati Technologies