काश्मीर : कुलगाममध्ये दहशतवादी आणि सैन्यात चकमक, दोन जणांचा खात्मा करण्यात सैन्याला यश

जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील मनगोरी परिसरात भारतीय सुरक्षा दल आणि दहशतवात्यांमध्ये चकमक झाली.

नवी दिल्ली | कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी देशभरासह जम्मू-काश्मीरमध्येही लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवा वगळता बाहेर पडण्यासाठी निर्बंध घालण्यात आले आहेत. मात्र दुसरीकडे दहशतवाद्यांकडून कुरघोडी केली जात आहे. दरम्यान दहशतवाद्यांचा घुसखोरीचा आजचा डावही भारतीय सैन्यानं उधळून लावण्यात आला आहे. या चकमकीमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

दहशतवाद्यांनी भारतीय सुरक्षा दलावर हल्ला केला. या दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देण्याचं काम भारतीय सुरक्षा दलाकडून केलं जात आहे. जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील मनगोरी परिसरात भारतीय सुरक्षा दल आणि दहशतवात्यांमध्ये चकमक झाली. यामध्ये काही दहशतवाद्यांना भारतीय सुरक्षा दलानं घेरले. यामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. तर सर्च ऑपरेशन सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.AM News Developed by Kalavati Technologies